नुकताच ५ ऑगस्टला श्रीरामजन्मभूमीवर संकल्पित भव्य मंदिर उभारणीचं भूमिपूजन विधीवत व आनंदमयी वातावरणात करण्यात आलं आणि संपूर्ण भारतवासियांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं.' याच साठी केला होता अट्टाहास शेवटचा दीस गोड झाला ' असा कृतार्थतेचा भाव आपल्या सर्वांच्याच मनात व चेहऱ्यावर दाटून आलेला होता.या आनंदाच्या सुवर्णक्षणांवर आपल्या अमोघ वाणीतून अक्षरशः अमृताची बरसात सोहळ्यातील दोन महनीय व्यक्तींच्या मुखातून झाली याचे सर्वाधिक अप्रूप वाटले.अनेकांनी समाज माध्यमातून खूप सकारात्मक चर्चा केली आहे.या सर्व चर्चांबाबत माझ्या मनात आलेला भाव मी सर्वत्र व्यक्त केला व तो अनेकांना आवडला.तो भाव असा होता,'' काल मोदीजी बोलतच नव्हते त्यांच्यातला आत्माराम बोलत होता.ज्यांनी दासबोध वाचला असेल त्यांना 'आत्माराम ' संकल्पना लक्षात येईल. जी कठोर साधनेतून प्राप्त होते."
'आत्माराम'हा वेदांतपर ग्रंथ आहे; समर्थांच्या मते भगवंताची भक्ती केली म्हणजे वेदांतातील तत्त्वज्ञान जीवनात उतरते. माणसाला परब्रह्माचा प्रत्यक्ष अनुभव येतो. मात्र त्यासाठी सत्पुरुषांच्या सहवासात राहून वारंवार श्रवण करावे लागते आणि संतांनी सांगितले त्यानुसार आपल्या जीवनाला आकार द्यावा लागतो. याचा अर्थ, समर्थांच्या मते भक्तीशिवाय ज्ञानाची प्राप्ती होऊ शकत नाही. नुसते श्रवण पुरेसे नाही. ज्याच्याकडून ज्ञान हवे आहे, त्याची सेवा घडायला हवी आणि त्याच्याशी मनाने एकरूप व्हायला हवे.
सरसंघचालक मा.मोहनरावजी भागवत आणि देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रभाई मोदी या दोघांच्याही जीवनाकडे पाहिल्यानंतर ही अनुभूती आपल्याला येते.
प्रभु श्रीरामस्वरूप देशाला देव मानून ही भगवंताची भक्ति या दोघांनीही मनापासून केली म्हणून त्यांच्या जीवनात वेदांताचं तत्वज्ञान उतरलं.परब्रह्माची प्रत्यक्ष अनुभूती येण्यासाठी परम पूजनीय श्रीगुरूजी आणि अगणित सत्पुरूषांचा सहवास त्यांना लाभला.अनेक साधूसंतांच्या सान्निध्यात देखील ते राहिले.मोदीजी काही काळ अध्यात्ममार्गात देखील होते.आपल्या गुरूंच्या आज्ञेनुसारच ते राजकारणात सेवाभाव मनात ठेवून ते आले.आपापल्या सान्निध्यातील सत्पुरूषांनी दिलेल्या मार्गानुसारच त्यांनी आपल्या जीवनाला आकार दिला.समर्थांच्या उक्तीनुसार या भक्तीतूनच त्यांना ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे.संघकार्य असो किंवा अध्यात्ममार्ग तिथे केवळ श्रवणभक्ती असून चालत नाही तर ज्याच्यापासून ज्ञान घेतलं तर याची सेवा घडावी लागते त्याच्याशी एकरूप व्हावं लागतं.ही जिवीत कार्यातील एकरूपता दोन्हीही व्यक्तिमत्वात आपल्याला पहायला मिळते.आत्माराम दासबोधात समर्थांनी यालाच स्व स्वरूप म्हंटलं आहे.
आत्माराम मधील केवळ दोन ओव्या या दृष्टीने महत्त्वाच्या वाटतात.
त्यागिसी सकळ वैभवालां । आणि विश्वाससी माझिया बोला ॥
तरी मी घालीन रे तुजला । जेथील तेथें ॥ म्हणजे सर्वस्वाचे समर्पण करून माझ्या बोलण्याप्रमाणे आचरण केलं तर तूला मी सत्यस्वरूपापर्यंत नेईन.हे समर्थांनी आपल्या शिष्यांना दिलेलं वचन आहे.ठीक याच प्रकारचा व्यवहार या दोन्ही मान्यवरांचा असल्यानेच त्यांच्या मुखातून हे अमृताचे बोल प्रगटले.
दुसऱ्या एका ओवीत समर्थ म्हणतात,
बोलणें तितुके वेर्थ जातें । परी बोलतां बोलतां अनुभवा येते॥अनुभव सोडितां, तें । आपणचि होईजे ॥
शाब्दिक बोलणें हे अपूर्ण व नाशिवंत आहे ,परंतु अशी चर्चा करता करताच त्या शब्दामागचा माझा भाव अकस्मात आपल्या अनुभवाला येऊ लागतो आणि मग त्या अनुभवाला सोडल्यावर जो अनुभव उरेल तेच सत्यस्वरूप असतं.या सत्यस्वरूपाचं दर्शन या दोन्ही भाषणातून आपल्या अनुभवाला आलं म्हणून ही 'आत्मारामांची अमृतवाणी 'असल्याचे आपण अनुभवले.
पूजनीय सरसंघचालक यांनी या प्रसंगी केलेलं भाषण यादृष्टीने महत्त्वाचं आहे.ते म्हणतात की,
" आज संपूर्ण देशात एक आनंदाची लाट आली आहे.। शतकानुशतकाची इच्छा आज पूर्ण होतेय.परंतु त्याहीपेक्षा सर्वात मोठा आनंद भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी ज्या आत्मविश्र्वासाची आवश्यकता होती आणि जेआत्मभान आवश्यक होतं ते सगुण-साकार रूपात प्रस्थापित होण्याचा हा शुभारंभ आज आहे. हे अधिष्ठान है आध्यामिक दृष्टिचं आहे.
' सिया राममय सब जग जानी 'सर्व जगाला आपल्यात पाहण्याची आणि आपल्यात संपूर्ण जग पाहण्याची ही भारतीय दृष्टि आहे. त्यामुळेच इथे प्रत्येक व्यक्तिचा व्यवहार आजसुद्धा जगात सर्वाधिक सौजन्याचा व्यवहार असतो.आणि आमच्या देशाचा सामूहिक व्यवहार सर्वांसोबत ' वसुधैव कुटुम्बकम ' चा असतो. परमवैभव संपन्न आणि सर्वांच्या कल्याणाचा विचार करणारा भारत त्याच्या निर्माणाचा हा शुभारंभ आहे.
एतद्देशप्रसूतस्य सकाशादग्रजन्मनः
स्वं स्वं चरित्रं शिक्षेरन्पृथिव्यां सर्वमानवाः'
जीवन जगायचं कसं? याची दृष्टी आमच्याजवळ आहे. कोरोनाच्या स्थितीत संपूर्ण जग अंर्तमुख झालंय.त्यांना चिंता आहे कुठे चुकलं याची.यातून मार्ग कसा काढायचा याची. तो आमच्याजवळ आहे. तो मार्ग दाखवण्याचं काम आम्हाला करायचंय. त्याची तैयारी करण्याचा संकल्प आज होतोय.
अशा प्रकारचा विश्वास, प्ररेणा, स्फुरण आज आम्हाला मिळतंय कारण 'राम सर्वांचे आहेत आणि सर्वांमध्ये राम आहेत. " ही अनुभूती सरसंघचालकांना मिळाली ती त्यांच्या वाणीतून त्यांनी प्रगट केली.
मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण सुध्दा तेवढ्याच तोलामोलाचं होतं.ते म्हणाले की,
" आज पूर्ण भारत राममय झाला आहे. भारताच्या श्रद्धेची ही शक्ती संपूर्ण जगासाठी अभ्यासाचा विषय आहे. सत्यावर अढळ राहणे हेच श्रीरामांच्या चरित्राचा केंद्रबिंदू आहे. म्हणूनच हजारो वर्षांपासून श्रीराम आपल्यासाठी आशेचा केंद्र आहे. श्रीरामांचं व्यक्तित्व युगानुयुगे प्रेरणा देत राहील. त्यांची गरिबांवर विशेष दृष्टी आहे. जीवनाचा असा एकही पैलू नाही जेथे राम प्रेरणा देत नसतील. भारताची एकही अशी भावना नाही जेथे प्रभू राम नाहीत तसाच आज देशातील प्रत्येकाच्या सहकार्याने राम मंदिराच्या निर्माणाचं काम सुरु झालं आहे. जसा रामसेतू तयार झाला, तसाच गावागावातून आलेल्या विटा, माती, नद्याचं पाणी येथे प्रेरणा देत आहे. ही अमोघ शक्ती आहे. हे न भूतो न भविष्यती आहे . कोरोनामुळे तयार झालेल्या परिस्थितीमुळे भूमिपूजनाच्या या कार्यक्रमाला अनेक मर्यादा आल्या आहेत. श्रीरामांच्या कामात जी मर्यादा दाखवली पाहिजे तीच मर्यादा आज आपण दाखवून दिली. अशीच मर्यादा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर दाखवली होती. तेव्हा देखील देशाने सर्वांच्या भावनांचा आदर करत मर्यादा दाखवली होती. या मंदिरासोबत नवा इतिहासच रचला जात नाही, तर इतिहासाची पुनरावृत्ती देखील होत आहे.
हे मंदिर आपलं आधुनिक प्रतिक बनेल. शाश्वत आस्थेचं, राष्ट्रीय भावनेचं प्रतिक बनेल. हे मंदिर येणाऱ्या पिढ्यांना आस्था, श्रद्धा आणि संकल्पाची प्रेरणा देईल. शास्त्रात म्हटलं आहे की पूर्ण पृथ्वीवर श्रीरामांइतका नितीमान शासक कधीही झालेला नाही. कुणीही दुखी होऊ नये, गरिब असू नये. नर नारी सर्व समानपणे सुखी होवो, भेदभाव नको, असा श्रीरामांचा संदेश आहे
जगातील कितीतरी देश आहेत. जेथे राम कोणत्या ना कोणत्या रुपात अस्तित्वात आहेत.तुलसीचे राम सगुण राम, तर नानक यांचे निर्गुण राम आहेत. भगवान बुद्ध यांचाही रामांशी संबंध आहे. राम सर्व ठिकाणी आहेत, राम सर्वांचे आहेत. राम भारताच्या अनेकतेत एकतेचं प्रतिक आहेत. जगातील अनेक देश रामाचं नाव घेतात. ते देश श्रीरामांशी स्वतःला जोडून घेतात. जगातील सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियात आजही राम पूजनीय आहेत
भारताच्या श्रद्धेची ही शक्ती संपूर्ण जगासाठी अभ्यासाचा विषय आहे. सत्यावर अढळ राहणे हेच श्रीरामांच्या चरित्राचा केंद्रबिंदू आहे. म्हणूनच हजारो वर्षांपासून श्रीराम आपल्यासाठी आशेचा केंद्र आहे. श्रीरामांचं व्यक्तित्व युगानुयुगे प्रेरणा देत राहील. त्यांची गरिबांवर विशेष दृष्टी आहे. जीवनाचा असा एकही पैलू नाही जेथे राम प्रेरणा देत नसतील. भारताची एकही अशी भावना नाही जेथे प्रभू राम नाहीत . देशातील प्रत्येकाच्या सहकार्याने राम मंदिराच्या निर्माणाचं काम सुरु झालं आहे. जसा रामसेतू तयार झाला, तसाच गावागावातून आलेल्या विटा, माती, नद्याचं पाणी येथे प्रेरणा देत आहे. ही अमोघ शक्ती आहे. हे न भूतो न भविष्यती आहे. राम मंदिरासाठी सुरु असलेल्या आंदोलनात अर्पणही होते आणि तर्पणही होते, संघर्षही होता आणि संकल्पही होता. ही अनुभूती पंतप्रधान मोदींना आली तीच त्यांनी प्रांजळपणे मांडली.
देशाच्या संस्कृतीविषयी,सभ्यतेविषयी गर्वाने बोलणारा पंतप्रधान यानिमित्ताने सर्वांनी पाहिला.हे त्यांचे सहजोद्गार होते जे सत्यस्वरूपाची अनुभूती घेतल्याशिवाय मुखातून बाहेर पडत नाहीत.म्हणूनच अयोध्येत झालेली दोन्ही भाषणे ही आत्मारामांची अमृतवाणीच होती.असे आग्रहाने नमूद करावेसे वाटते.
शशिकांत घासकडबी, नंदुरबार.
No comments:
Post a Comment