महाराष्ट्राची माती कणकणात वसते शक्ती || धृ ||
.
माय भवानी आदिशक्ती मल्हारी यळकोट गर्जतो
विठुरायाचे दर्शन घेता भक्तांचाही ऊर दाटतो
हरिनामाचा घोष निनादे चंद्रभागेच्या काठी || १ ||
शिवरायांची गौरवगाथा पराक्रमाची स्फूर्ती देते
संतजनांची अभंगवाणी सत्संगाची महती गाते
मायबोलीच्या मधुर स्वरांनी शब्दांतून पाझरते भक्ती || २ ||
मुंबईत बहु दाटीवाटी कोकणचा तर बाज आगळा
सह्याद्रीची सुपीक माती मराठवाडी प्रेम जिव्हाळा |
खान्देशाची बोली रांगडी विदर्भातली खाद्यसंस्कृती || ३ ||
महाराष्ट्रभू महान जगती सत्पुरूषांची इथे न गणती
विज्ञानाची कास धरूनी देवू ज्ञानाची गंगोत्री
घेवू भरारी जगी नांदवू विश्वासाची नाती || ४ ||
शशिकांत घासकडबी, नंदुरबार
९५२७१५३९२५
No comments:
Post a Comment